स्पेनच जगज्जेता…

July 12, 2010 6:41 AM0 commentsViews: 1

12 जुलै

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये स्पेनने तगड्या हॉलंडचे आव्हान मोडीत काढत विजेतेपद पटकावले.

एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करत स्पेनने फूटबॉल वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. युरोपियन जेतेपदापाठोपाठ फूटबॉल वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावत स्पेनने इतिहास रचला.

दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी स्पेनचा कॅप्टन इकर कॅसिलासच्या हातात वर्ल्डकपची ट्रॉफी दिली आणि स्पेनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. स्पर्धेतील पहिली मॅच गमावल्यानंतरही स्पेनने आपली कामगिरी उंचावत वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

गोल्डन बूटसाठी चुरस

वर्ल्ड कपची मेगाफायनल स्पेनने जिंकली असली, तरीही गोल्डन बूटसाठी मात्र जबरदस्त चुरस बघायला मिळाली.

गोल्डन बूटसाठी स्पेनच्या डेव्हिड विल्ला, हॉलंडच्या वेस्ली स्नायडर, जर्मनीच्या थॉमस मुल्लर आणि उरुग्वेच्या फॉरलॉनमध्ये चुरस होती. आणि यात जर्मनीच्या थॉमस मुल्लरने बाजी मारली. या चौघांच्याही खात्यात प्रत्येकी 5 गोल्सची नोंद आहे. पण तरीही मुल्लर गोल्डन बूटचा मानकरी ठरला आहे.

तिसर्‍या क्रमांकाची मॅच जर्मनी आणि उरुग्वेत शनिवारी पार पडली. तरीही गोल्डन बूटचा मानकरी कोण होणार हे स्पष्ट झालेले नव्हते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या मेगाफायनलकडे लागले होते. पण या मेगाफायनलमधूनही गोल्डन बूटचा निकाल लागला नाही.

गोल्डन बुटासाठीची लढत जबरदस्त चुरशीची होती. जर्मनी आणि उरुग्वेच्या मॅच संपल्याने व्हिला आणि स्नायडरला गोल्डन बूट पटकवाण्याची एक नामी संधी होती. पण मेगाफायनलमध्ये विल्ला किंवा स्नायडर दोघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे या चौघांतही टाय झाला.

फिफाच्या नियमांनुसार ज्या प्लेअरने गोल करण्यात जास्तीत जास्त मदत केली त्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. या नियमानुसार मुल्लरला हे ऍवॉर्ड देण्यात आले.

close