बेळगावात अमानुष लाठीमार

July 12, 2010 8:35 AM0 commentsViews: 1

12 जुलै

बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चावर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीमार केला.

बेळगाव कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकाला विरोध म्हणून एकीकरण समितीने हा निषेध मोर्चा काढला होता.

अतिशय शांततेत जिल्हाधिकारी ऑफिसवर निघालेल्या या मोर्चावर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला.

या मोर्चाला परवानगी देऊ नये म्हणून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.