बेळगावसाठी पंतप्रधानांची भेट

July 14, 2010 4:18 PM0 commentsViews: 1

14 जुलै

बेळगावच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची दिल्लीत भेट घेतली.

केंद्राने बेळगावबाबत तटस्थ भूमिका घ्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. बेळगावामध्ये मराठी माणसावर होत असलेल्या अत्याचारात लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. पण बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी मात्र आता बाजूला पडली आहे.

विधानसभेत जो सर्वपक्षीय ठराव झाला होता, त्याच्याच आधारे पंतप्रधानांकडे महाराष्ट्राची बाजू मांडली गेली. पंतप्रधानांनी ठरावाची प्रत गृहमंत्र्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

close