शिवडीत पुन्हा गॅस गळती

July 15, 2010 1:03 PM0 commentsViews: 1

15 जुलै

शिवडीच्या हाजीबंदर भागात आज पुन्हा एकदा क्लोरीन वायूची गळती झाली. कालच या भागात क्लोरीनची गळती झाली होती. क्लोरीन वायूचे सिलेंडर निकामी करताना ही वायू गळती झाली.फायर ब्रिगेडचे अधिकारी सिलेंडर निकामी करत असतानाच ही घटना घडली.

कालच्या घटनेतील बाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. अजूनही 46 जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान बॉम्बे पोर्ट ट्रस्टने गॅस गळती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राहुल अस्थाना यांनी केली. अस्थाना स्वत:च या समितीचे अध्यक्ष आहेत.

close