‘बाभळी’वर चंद्राबाबू अटकेत

July 16, 2010 12:18 PM0 commentsViews: 8

16 जुलै

महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोदावरी नदीवरच्या बाभळी बंधार्‍याचा प्रश्न आता पेटला आहे. या ठिकाणी मोर्चा घेऊन धडकणारे तेलुगु देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना महाराष्ट्रात घुसण्याचा प्रयत्न करताना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली.

चंद्राबाबूंसोबत 5 आमदार आणि 7 खासदारांना अटक झाली. 10 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे आंदोलन करण्यात आले आहे. जमावबंदीच्या144 कलमान्वये आदेश काढून, त्याअंतर्गत चंद्राबाबू यांना अटक करण्यात आली.

यावेळी चंद्राबाबू नायडूंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाभळीपासून 4 किलोमीटरवर महाराष्ट्र – आंध्रप्रदेशच्या सीमेवर चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या समर्थकांसह ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चंद्राबाबूंना नायडूंना अटक करण्यात आली.

काय आहे बाभळीचा वाद?

1995 मध्ये बाभळी प्रकल्पाला मान्यता

2004 मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरूवात

आतापर्यंत बाभळी प्रकल्पावर 200 कोटी खर्च

या धरणामुळे आंध्रप्रदेशला पाणी मिळणार नाही, असा आक्षेप आंध्रप्रदेशने घेतला

हे पाणी महाराष्ट्रचे आहे, त्यामुळे हे पाणी महाराष्ट्रातच राहणार असा दावा महाराष्ट्राने केला आहे

11 मे 2005 ला पहिल्यांदा तेलुगु देसम पार्टीच्या शिष्टमंडळाने बाभळी बंधार्‍याला भेट दिली. आणि भेटीनंतर विरोध करण्याचे भाकीत केले

28 मार्च 2006 रोजी आंध्रप्रदेशच्या एका माजी खासदारांनी सुप्रीम कोर्टात आंध्राच्या बाजूंनी याचिका दाखल केली

close