रेल्वे अपघातात 50 ठार

July 19, 2010 6:24 AM0 commentsViews: 1

19 जुलै

पश्चिम बंगालमधील सैथिया स्टेशन इथे झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 110 जखमी झाले आहेत.

बीरभूम येथील सैथिया स्टेशनवर आज पहाटे दोनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. स्टेशनमध्ये थांबलेल्या वनांचल एक्सप्रेसवर उत्तरबंग एक्सप्रेस येऊन धडकली.

वनांचल एक्सप्रेस भागलपूरहून रांचीला जात होती. या गाडीचे तीन डबे अपघातग्रस्त झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बीरभूम हॉस्पिटलमध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्य सुरू झाले आहे. सीआरपीएफ आणि बचाव टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

close