‘सेव्हनहिल्स’ची होणार चौकशी

July 20, 2010 11:39 AM0 commentsViews: 2

20 जुलै

राज्यसरकार आता मुंबईतील सेव्हनहिल्स हे फाईव्ह स्टार हॉस्पिटल आणि महापालिका यांच्यातील कराराची चौकशी करणार आहे. अंधेरीतील मरोळ इथे मुंबई महापालिकेने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमधून सेव्हनहिल्स हे पंचतारांकित हॉस्पिटल सुरू केले. त्यासाठी 17 वर्षांच्या भाडेपट्‌ट्यावर हॉस्पिटलला जमीन देण्यात आली. पण यात आवश्यक असलेला सामंजस्य करार न करताच हॉस्पिटल सुरू झाले.

शिवाय सर्वसामान्य पेशंटसाठी 20 टक्के बेड राखीव ठेवण्याची अटही पाळण्यात आलेली नाही. तसेच नोकर्‍यांमध्ये 80 टक्के भूमीपुत्रांना स्थानही देण्यात आलेले नाही, असा ठपका राज्यसरकारने ठेवला आहे. त्यामुळे महापालिका आणि हॉस्पिटलदरम्यान झालेल्या सर्व व्यवहाराची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

close