‘मावशी-भाच्या’चा विहिरीत मुक्काम

July 20, 2010 11:55 AM0 commentsViews: 17

20 जुलै

गोष्टीतल्या मावशी-भाच्यानं एकत्रच विहिरीत मुक्काम ठोकल्याचे दृश्य आज नाशिकमधील सटाणा तालुक्यातील नळकेसमध्ये पाहायला मिळाले.

भाचा म्हणजे बिबट्या…आणि मावशी होती, एक पांढरीशुभ्र मांजर…या मांजराच्या मागे धावताना हा बिबट्या विहिरीत पडला. विहिरीच्या कपारीत लपून मनीमाऊने कसाबसा जीव वाचवला. पण बिबट्याला मात्र रात्रभर धडपडत राहावे लागले. सकाळी त्यांना पाहायला मोठी गर्दी झाली. वनविभागाने विहिरीत शिडी टाकली. त्यावरून चढून बाहेर येत बिबट्याने धूम ठोकली. आणि मनीमाऊचा जीव वाचला…

close