पंढरीत विठूभक्तांची मांदियाळी

July 21, 2010 3:20 PM0 commentsViews: 117

21 जुलै

'विठ्ठल विठ्ठल गजरी…अवघी दुमदुमली पंढरी', अशी विठ्ठलनामाने दुमदुमणारी पंढरी आज लाखो नेत्रांनी पाहिली. चंद्रभागेत स्नान करून विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर 'याजसाठी केला होता अट्टाहास', अशी कृतार्थ भावना वारकर्‍यांनी व्यक्त केली.

आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या वारकर्‍यांनी अवघी पंढरी आज फुलून गेली.

पहाटेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सपत्नीक पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची महापूजा केली. या वर्षी विठूरायाच्या पूजेचा मान मिळाला, औरंगाबादच्या उध्दव तारे आणि त्यांच्या पत्नी मीना तारे यांना.

यावर्षी पंढरपुरात 10 लाखांहून अधिक भाविक आले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी अजूनही काही किलोमीटरची रांग लागली आहे.

close