मुंबईत जोरदार पाऊस

July 22, 2010 10:10 AM0 commentsViews: 3

22 जुलै

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील काही भागांत पाणी भरले आहे. पवईतील मिलिंदनगर भागातही पाणी भरले होते.

पावसामुळे विक्रोळी जोगेश्वरी लिंक वरील वाहतूक विस्कळीत झाली. ट्राफिक पोलिस ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.

नवी मुंबईतही पाऊस

नवी मुंबईतही काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. आतापर्यंत 58.22 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नेरुळला सगळ्यात जास्त पाऊस पडला आहे.

नालासोपार्‍यात पाणी साचले

रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे वसई तालुक्यातील नालासोपार्‍यातही पाणी भरले आहे. अचोळे सेन्ट्रल पार्क, तुळींजरोड, गालानगर भागात पाणी भरले आहे. त्यामुळे काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

पाऊस थांबला असला तरी गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वसईतील वेळगावात पाणी भरले आहे. या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागत आहे. महानगरपालिकेच्या इमारतीतही पाणी भरले आहे.

close