नवी मुंबई विमानतळाचा तिढा कायम

July 22, 2010 10:19 AM0 commentsViews: 2

22 जुलै

नवी मुंबई विमानतळाचा तिढा अजूनही सुटायला तयार नाही. या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळवण्यात सिडकोला पुन्हा एकदा अपयश आले आहे. सिडकोचे अधिकारी आणि पर्यावरण मंत्रालय यांच्यात दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

या प्रकल्पाच्या जागेतील नद्यांचे मार्ग कसे बदलले जातील, खारफुटींची पुनर्लागवड कुठे आणि कशी करता येईल, अशा अनेक मुद्द्यांवर पर्यावरण मंत्रालयाचे समाधान झाले नाही. त्यामुळे आता पुढची बैठक या महिनाअखेर होणार आहे. जोवर पर्यावरण मंत्रालयाची बैठक होत नाही तोवर या विमानतळाच्या कामाला सुरूवात होऊ शकत नाही.

यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण समितीचे सदस्य संजीव नाईक आणि सुप्रिया सुळे यांनी आज नवी मुंबईत पाहणी केली. या दौर्‍याच्या वेळी आपण केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांची सुप्रिया सुळे आणि सगळे खासदार म्हणून भेट घेऊ, असे संजीव नाईक यांनी सांगितले. आणि पर्यावरणासंदर्भात ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

close