मुरलीचं मिशन 800 पूर्ण

July 22, 2010 11:06 AM0 commentsViews: 2

22 जुलै

गॉल टेस्टमध्ये अखेर मुरलीने इतिहास रचला. प्रग्यान ओझाला आऊट करत त्याने टेस्टमधली आपली 800वी विकेट घेतली. ईशांत शर्मा आणि प्रग्यान ओझा या भारताच्या शेवटच्या जोडीने मात्र मुरलीला जवळ जवळ तासभर या विकेटसाठी रडवले.भारतीय टीमकडे दुसर्‍या इनिंगमध्ये सध्या जेमतेम 100 रन्सची आघाडी आहे.

आणि एक विकेट हातात आहे. मुरलीधरन आज सकाळी मैदानावर आला तोच रेड कार्पेटवरुन..मैदानात त्यावेळी फटाकेही फोडण्यात आले.

याअगोदर गॉल टेस्टच्या चौथ्या दिवशी तब्बल 6 विकेट घेत मुरलीने या रेकॉर्डकडे आगेकूच केली होती. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट जगातला एकमेव बॉलर ठरला आहे. 133 टेस्टमध्ये त्याने हा विक्रम केला.तसेच टेस्टमध्ये सगळ्यात जास्त वेळा 5 विकेट्स आणि 10 विकेट्स घेण्याचाही विक्रम त्याच्याच नावावर आहे.

close