नागपुरातलं ‘पणती गाव’ पेठगाव

October 23, 2008 12:15 PM0 commentsViews: 78

23 ऑक्टोबर, नागपूर – दिवाळी म्हणजे रोशणाईचा सण. पणत्या तयार करण्याचं काम अनेक ठिकाणी दिवाळी या सिझन पुरतं चालतं. पण नागपुरातल्या पेठ गावात वर्षभर हे काम सुरू असतं. गावातली सर्व कुटुंबं वर्षभर पणत्यांच्या व्यवसायात गुंतलेली असतात.पाच पैशाला डझन भर पणत्या मिळायच्या तेव्हापासून गावात हा व्यवसाय सुरू झाला. मात्र आता व्यवसायाचं स्वरुप खूपच बदललं आहे. फायदाही वाढला आहे. दिसायला छोट्याश्या असलेल्या या गावाचा दिवाळीच्या सिझनमधला टर्न ओव्हर पंचवीस लाखापेक्षा जास्त असतो. गावात बनणार्‍या टेराकोटा दिव्यांना तर दूरदूरच्या गावांतून मोठी मागणी असते. दिवाळी उजाडत नाही तोवरच पुढच्या वर्षीच्या ऑडर्सचे वेध लागतात. दिवाळी असो वा नसो पण लोकांचं घर-संसार उजळून टाकण्यासाठी वर्षभर हे गाव सतत झटत असतं.

close