अहमदनगरमध्ये अपघात, 7 ठार 5 जखमी

July 22, 2010 11:33 AM0 commentsViews: 1

22 जुलै

अहमदनगर-सोलापूर रोडवर बोलेरो जीपने कंटेनरला धडक दिल्याने, झालेल्या भीषण अपघातात सातजण ठार, तर पाचजण जखमी झाले आहेत. अहमदनगरमधील बनपिंपरी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त कर्नाटकातील विजापूरचे आहेत. हे सगळेजण शिर्डीला उत्सवासाठी चालले होते. जखमींना अहमदनगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हलगर्जीपणामुळे मृत्यू

जखमींना हॉस्पिटलमध्ये नेत असताना, नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीमुळे एका अपघातग्रस्ताला प्राण गमवावा लागला. तर आणखी एक पेशंट स्ट्रेचरवरून नेत असताना खाली फरशीवर पडले. त्यानंतर या जखमीला कर्मचार्‍यांनी अक्षरश: ओढत नेले. कर्मचार्‍यांच्या या बेपर्वा वृत्तीमुळे तिथे संताप व्यक्त होत आहे. त्यातही सरकारची बेपर्वाई म्हणजे गेल्या 3 महिन्यांपासून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला वैद्यकीय अधीक्षकच नाही.

त्यामुळे कर्मचारी आणि डॉक्टर्स मन मानेल तसे वागत आहेत.

close