गावकर्‍यांचा पोलिसांवर हल्ला

July 22, 2010 11:54 AM0 commentsViews: 8

22 जुलै

ठाण्यातील सापने-कडवपाडा या ग्रामीण विभागात काल रात्री गावकर्‍यांनी पोलिसांवरच प्राणघातक हल्ला केला. हे पोलीस मोटार सायकल चोरीचा तपास करण्यासाठी या ठिकाणी गेले होते. आरोपी निलेश दिघे आणि सुधीर गायकवाड यांना अधिक तपासासाठी सापने -कडवपाडा गावात घेऊन गेले होते. तिथेच पोलिसांना खोलीत बांधून सळईने मारहाण करण्यात आली.

या हल्ल्यात पीएसआय रवींद्र जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बोईसर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

close