सेझमुळे खारफुटी धोक्यात

July 22, 2010 12:35 PM0 commentsViews: 97

22 जुलै

नवी मुंबईतील सिडको आणि रिलायन्सच्या सेझ प्रकल्पामुळे उरण भागातील सागरी किनारपट्टीवरील खारफुटी नष्ट होत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात मातीचा भराव टाकला जात असल्याने फ्लेमिंगोसारख्या अनेक स्थलांतरित पक्षांचा या ठिकाणचा वावर कमी झाला आहे.

याबाबतची एक तक्रार 'सेव्ह उरण' या संस्थेने केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने खासदार सुप्रिया सुळे आणि संजीव नाईक यांच्या कमिटीला परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.

त्या दृष्टीने आज सुप्रिया सुळे आणि संजीव नाईक यांनी या क्षेत्राची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात भरावाची कामे सुरू असल्याचे निदर्शनास आले.

याबाबतचा आणखीन एक पाहणी दौरा करुन हा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सादर करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पर्यावरणाच्या मुद्दयामुळे नवी मुंबई एअरपोर्ट रखडला आहे, आता सेझ प्रकल्पालाही विलंब होण्याची शक्यता आहे.

close