विवेक पंडीत यांचे साखळदंड आंदोलन

July 22, 2010 12:42 PM0 commentsViews: 57

22 जुलै

आमदार विवेक पंडीत यांनी आज विधानभवनाच्या पायरीवर साखळदंडाने हात बांधून घेत अनोखे आंदोलन केले.

वसईतील पोलिसांचा लाठीचार्ज आणि महापालिकेत गावांचा समावेश करण्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले.

संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर पंडीत यांनी हे आंदोलन मागे घेतले.

वसईतील लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध नोंदवताना पंडीत यांनी आपले हात साखळदंडानं बांधले होते. तसेच तोंडावरही पट्टी बांधली होती.

close