साईबाबांचा रथ झाला सोन्याचा

July 22, 2010 12:48 PM0 commentsViews: 5

22 जुलै

ज्या लाकडी रथासोबत शिर्डीतून साईबाबांची मिरवणूक निघत होती, तो रथ आता सोन्या-चांदीचा झाला आहे.

एका भक्ताने 35 लाख रुपये खर्च करून त्याला नवे रूप दिले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या रथातून साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक निघणार आहे.

शिर्डीत गेल्या 92 वर्षांपासून दरवर्षी रामनवमी, विजयादशमी आणि गुरूपैर्णिमेला साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक निघते. ही मिरवणूक लाकडी रथातून काढली जात होती.

पण या वेळी कर्नाटकच्या मोहम्मद आसीफ या साईभक्ताने रथाला चांदी लावण्यासाठी 35 लाख रूपये खर्च केले. तर हैदराबादच्या विजयकुमार यांनी सोन्याच्या मुलामा दिला आहे.

close