गोंदियात गहू सडला

July 22, 2010 1:02 PM0 commentsViews: 2

22 जुलै

गोंदियाच्या फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे उघड्यावर पडलेला जवळपास 4 हजार मेट्रीक टन गहू सडला आहे.

हा गहू 28 मे ते 8 जूनच्या दरम्यान पंजाबमधून गोंदियात आणण्यात आला होता.

गोंदियातील एफसीआय गोडाऊनची क्षमता 30 हजार मेट्रीक टन आहे. त्यापैकी 20 हजार मेट्रीक टन धान्याने गोडाऊन भरले आहे. 10 हजार मेट्रीक टनाची जागा रिकामी असतानाही 4 हजार मेट्रीक टन गहू उघड्यावर ठेवला गेला.

हा गहू सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरीत करण्यासाठी पाठवण्यात आला होता. पण जिल्हाधिकार्‍यांनी तो खाण्यायोग्य नसल्याने परत पाठवला.

close