वरोराच्या आनंदवनात होत आहे शुभेच्छापत्रकांची निर्मिती

October 23, 2008 12:25 PM0 commentsViews: 16

23 ऑक्टोबर, वरोरा – सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक जण नवनवीन वस्तू खरेदी करत आहेत. पण आनंदवनातले कुष्ठरोगी मात्र दिवाळीचे ग्रीटींग कार्ड तयार करण्यात गुंग आहेत. कागदाच्या कच-यापासून ही मंडळी दिवाळीसाठी सुंदरशी ग्रीटींग कार्ड्स तयार करत आहेत. या शुभेच्छापत्रकांची यांची निर्यात पुणे आणि मुंबईत केली जाते. दर वर्षी आनंदवनातून 70 हजार ग्रीटींग कार्डची निर्यात केली जाते. आणि दिवाळीच्या निमित्ताने का होईना यांची कला लोकांपर्यत पोहोचते.

close