पुण्यात 53 जणांना H1N1ची लागण

July 22, 2010 2:25 PM0 commentsViews: 1

22 जुलै

पुण्यात गेल्या काही दिवसांत 53 जणांना H1N1ची लागण झाली आहे. तसेच 1 एप्रिलपासून 20 जुलैपर्यंत 53 जण दगावले आहेत. पण घाबरण्याची स्थिती नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने नागरिकांनी बाजारात आलेल्या लसी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात असे, आवाहन केले आहे. एक लस 3 वर्षांच्या पुढील वयोगटासाठी आहे. तर दुसरी लस 18 वर्षे वयाच्या पुढील वयोगटांतील नागरिकांनी घ्यायची आहे.

दुसरीकडे सामाजिक संस्थांकडून पुण्यातील सीरम संस्थेने तयार केलेली नाकावाटे घ्यावयाची लस शालेय विद्यार्थ्यांना मोफत देण्यास सुरवात केली आहे.

शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने हडपसर भागातील 9 हजार विद्यार्थ्यांना मोफत लस देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

close