फलटणच्या रस्त्यांवर दुधाचे पाट

July 22, 2010 3:28 PM0 commentsViews: 10

22 जुलै

आयात शुल्क माफ करून परदेशातून 30 हजार टन दूध पावडर आणि 15 हजार टन तूप राज्य सरकार आयात करत आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत येणार असल्याने शेतकरी संघटना व शिवसेना आक्रमक झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर क़ृषीमंत्री शरद पवार यांच्या मतदार संघातील फलटण येथे स्वराज्य या खाजगी दूध संघाचे चार टँकर रस्त्यावर रिकामे करण्यात आले.

एकीकडे राज्य शासन आयात करणार्‍या या दूध पावडरी वरील आयात शुल्क माफ करत आहे. तर दुसरीकडे खाजगी दूध संघांनी कालपासून शेतकर्‍यांकडील 20 टक्के दूध घेणे नाकारले आहे.

याच्या निषेधार्थ शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या वतीने फलटण येथे आज चार दूध टँकरमधील दूध ओतून देण्यात आले. त्यामुळे फलटणच्या चौकांतील रस्त्यांवर दुधाचे पाट वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

close