अमेय तिरोडकर यांना रामनाथ गोएंका पुरस्कार

July 22, 2010 5:26 PM0 commentsViews: 53

22 जुलै

'आयबीएन-लोकमत'चे रिपोर्टर अमेय तिरोडकर यांना पर्यावरण विषयक रिपोटीर्ंगचा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार देऊन आज गौरवण्यात आले.

'खोल खोल खाणी' या विषयावरील रिपोर्ताजबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. तिरोडकर यांनी कोकणातील बेसुमार मायनिंगचं चित्रण या रिपोर्ताजमध्ये केले होते.

याच कार्यक्रमात 'सीएनएन-आयबीएन'चे उत्तर-पूर्व भारताचे रिपोर्टर अरीजित सेन यांना 'ट्रू लाईज इन मणीपूर' या डॉक्युमेंटरीसाठी तसेच फिल्म आणि टीव्ही जर्नलिझम विभागात सुरेश मॅथ्यू यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

close