लोकमान्य टिळक पुरस्कार शीला दिक्षित यांना जाहीर

July 22, 2010 5:42 PM0 commentsViews: 20

22 जुलै

यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना जाहीर झाला आहे. 1 लाख रूपये, सुवर्णपदक , सन्मानपत्र, स्मृती चिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

1 ऑगस्ट रोजी लोकमान्यांच्या 90 व्या पुण्यतिथीदिनी पुण्यात टिळक स्मारक येथे हा सन्मानसोहळा होणार आहे.

पुरस्काराचे हे 28 वे वर्ष आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

close