मुंबईत पावसाचा जोर कायम

July 24, 2010 12:57 PM0 commentsViews: 1

24 जुलै

राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे तर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरातही पावसाची संततधार कायम आहे. सकाळी थोडी विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा मुसळधार बरसत आहे तर काही ठिकाणी कधी रिमझिम तर कधी जोरदार सरी बरसत आहे. गेल्या 24 तासांत शहरात 22.6 मिमी तर उपनगरात 37.2 आणि पश्चिम उपनगरात 20.4 मिमी पाऊस झाला.

समुद्राला भरती असल्यामुळे समुद्रात पोहायला जाऊ नये असं आवाहन करण्यात आले आहे. मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, कल्याण आणि अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पालिकेच्या शाळा सोडण्यात आल्या आहेत.

close