अबू सालेमवर हल्ला

July 24, 2010 1:10 PM0 commentsViews: 5

24 जुलै

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमवर आर्थर रोड जेलमध्ये हल्ला झाला आहे. दाऊद गँगचा गुंड मुस्ताफा डोसानं हा हल्ला केला आहे.मुस्तफा आणि सालेम दोघंही आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. या हल्ल्यात अबू सालेमच्या गालावर जखम झाली.

यामुळे ऑर्थर रोड जेलची सुरक्षा पणाला लागल्याचा औचित्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडला आहे. अबू सालेमवर हल्ला होत असेल तर कसाब कसा सुरक्षित राहील, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे. यावर कसाब सुरक्षित असल्याचं उत्तर भुजबळ यांनी विधानसभेत दिलं. यावर गृहमंत्री निवेदन करणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितले आहे.

close