कोकण रेल्वेच्या संकटात भर

July 26, 2010 10:11 AM0 commentsViews: 2

26 जुलै

कोकण रेल्वेसमोरची संकटे काही कमी होताना दिसत नाहीत. निवसर स्टेशनचा ट्रॅक खचलेला असतानाच आता याच स्टेशनजवळच्या कोंडवी बोगद्यावरचा डोंगराचा भाग खचला आहे. या डोंगराला मोठ्या प्रमाणावर लांब आणि खोल भेगा पडल्या आहे. वरची मातीही बोगद्याजवळ कोसळू लागली आहे. त्यामुळे ट्रॅकला धोका निर्माण झाला आहे. गेल्या 3 दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

कोळंबे गावात डोंगराला भेगा

रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावातील डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या घरांनाही भेगा गेल्यात. त्यामुळे 17 घरांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांनी आपापली घरे सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी अद्यापही इथे पोहोचलेले नाहीत.

close