श्रीलंकेची दणदणीत सुरुवात

July 26, 2010 11:50 AM0 commentsViews: 5

26 जुलै

भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या दुसर्‍या टेस्टमध्ये लंकन टीमने पहिली बॅटिंग करताना दणदणीत सुरुवात केली आहे.

पहिल्या दिवस अखेर टीमने 312 रन्स केले, ते फक्त दोन विकेट गमावून. पर्णवितणाने सीरिजमध्ये लागोपाठ दुसर्‍या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकली. तर कॅप्टन कुमार संगकारा 130 रन्सवर नॉटआऊट आहे. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 174 रन्सची पार्टनरशिप केली.

आज सकाळी टॉस जिंकल्यावर लंकन कॅप्टन संगकाराने वेळ न दवडता पहिली बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर लंकन बॅट्समननी रन्सची लूट सुरु केली. तीनही सेशन्सवर त्यांचेच वर्चस्व होते. आणि एकही भारतीय बॉलर त्यांना रोखू शकला नाही.

दिलशान आणि पर्णवितणा यांनी 99 रन्सची सलामी टीमला करुन दिली. त्यानंतर दिलशान 54 रन्सवर आऊट झाला. पण दुसरी विकेट मिळवायला भारतीय टीमला आणखी पाच तास वाट पहावी लागली.

अखेर ईशांत शर्माने पर्णवितणाला 100 रन्सवर क्लीनबोल्ड केले.

close