जळगाव जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनची साथ

July 26, 2010 12:04 PM0 commentsViews: 4

26 जुलै

जळगाव जिल्ह्यात गेले काही दिवस व्हायरल इन्फेक्शनची साथ पसरली आहे. जळगावच्या 6 तालुक्यांतील 631 विद्यार्थ्यांना याची लागण झाली आहे.

या व्हायरल इन्फेक्शनची तपासणी आता मुंबई आणि धुळ्याचे संयुक्त पथक करत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आदेशाने 15 तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक यासाठी जळगाव जिल्ह्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा गेले पाच दिवस बंद आहेत.

शाळेतल्या विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर ताप आला. मात्र खाद्यपदार्थ किंवा पिण्याच्या पाण्यामुळे हा त्रास झाला नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुण्याच्या सरकारी प्रयोगशाळेने 3 दिवसांपूर्वी दिला होता. हा अनकॉमन व्हायरल असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पण याची साथ आटोक्यात येत नसल्यामुळे पालकांमध्येही संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

close