पुणेकरांना होणार दररोज पाणीपुरवठा

July 26, 2010 12:09 PM0 commentsViews: 4

26 जुलै

पुण्याला एकदिवसाआड होत असलेला पाणी पुरवठा रद्द करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रोज पाणी पुरवठा होणार आहे.

गेल्या आठवड्यापासून पुण्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा होत होता. पावसाने दडी मारल्यानंतर आणि पुण्याच्या धरणांमधील पाणीसाठा संपत आल्यामुळे गेल्या आठवड्यात पुण्यात एकदिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला.

मात्र आता धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्याने पाणी पुरवठा दररोज होणार आहे. पण पुणेकरांना पूर्वी दिवसातून दोन वेळा होणारा पाणी पुरवठा आता एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे पाणी कपात रद्द न करता नियोजनात बदल करण्यात आला आहे.

close