महागाईविरोधात सेना-भाजप आमदारांची निदर्शने

July 26, 2010 12:13 PM0 commentsViews: 1

26 जुलै

महागाईच्या विरोधात आज शिवसेना-भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. भाजीपाल्यांचे हार घालून सेना-भाजप आमदारांनी निदर्शने केली.

राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केले. महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे.

त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.

close