शेअर मार्केट 9,771 अंशांवर बंद

October 23, 2008 1:22 PM0 commentsViews: 8

23 ऑक्टोबर, आयबीएन लोकमत ब्युरो – शेअर बाजारात शेअर्सच्या विक्रीचं जोरदार सत्र आजही दिसून आलं आहे. त्यामुळे शेअर बाजारात आज सलग दुसर्‍या दिवशीही घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये सुरुवातीलाच चारशे अंशांची घसरण झाली होती. तर निफ्टीनेही जुलै 2006 नंतर तीन हजारांपेक्षा खालच्या पातळीला स्पर्श केला आहे. दिवसभरात सेन्सेक्समध्ये फार थोडी रिकव्हरी झाली आहे. पण सेन्सेक्सचं क्लोजिंग दहा हजारांच्या खालीच झालं आहे.क्लोजिंगला सेन्सेक्समध्ये 398 अंशांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स 9,771अंशांवर बंद झाला. तर निफ्टीतही 122 अंशांची घसरण झाली. निफ्टी 2943अंशांवर बंद झाला. आज प्रत्येक सेक्टरमध्ये एक ते तीन टक्क्यांची घसरण झाली. आजचे टॉप गेनर्स आहेत ग्रासिम, भेल,एल अ‍ॅन्ड टी, एचडीएफसी बँकतर टॉप लूजर्स आहेत टाटा स्टील, टाटा मोटर्स, हिंदाल्को, रॅनबँक्सी.

close