पिंपरी-चिंचवडमधील घरकुल योजना वादात

July 26, 2010 12:21 PM0 commentsViews: 100

26 जुलै

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेली घरकुल योजना वादात सापडली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून ही योजना राबवली जाते. सरकारकडून या योजनेसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाला उशीर झाल्याने, या घरकुल योजनेचे पुढे काय होणार, यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आर्थिक मंदीमुळे यंदा हे अनुदान देणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने कळवले आहे. त्यामुळे घरकुल योजनेतून दिली जाणारी स्वस्त घरे आता महाग झाली आहेत. पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांनी याबाबत केलेल्या घोषणेमुळे घरे घेण्यार्‍यांचे स्वप्न भंगले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी फक्त दीड लाखात वन बीएचके देणारी घरकुल योजना 2008 साली सुरु केली होती. आर्थिक दुर्बल कुटुंबातल्या 13 हजार 250 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार होता. 18 हजार नागरिकांनी 500 रुपयाचा फॉर्म त्यासाठी भरला होता. आणि त्यातील 13 हजार 250 हजार नागरिकांनी निवड झाल्यावर 30 हजार रुपयांचा पहिला हप्ताही भरला होता. हातावर पोट असलेल्या यातील प्रत्येकाचे स्वत:च्या घराचे स्वप्न होते. पण आता ही घरे दुप्पट किंमतीची झाली आहेत.

घरकुल योजना एकूण 449 कोटींची होती. त्यातील 50 टक्के रक्कम केंद्राच्या अनुदानातून मिळणार होती. केंद्राने पहिल्या टप्प्यात 61 कोटी रुपयेही दिले. पण 30 टक्के अनुदान राज्य सरकार देणार होते. राज्य सरकारने हे अनुदान द्यायला आता नकार दिला. त्यामुळे आता नियोजित वेळेत म्हणजे 2011 पर्यंत ही घरे बांधून होतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या योजनेच्या लाभाथीर्ंना आता पालिकेने जादा 2 लाख रुपये जादा भरा, आणि घरे मिळवा, असे सांगितले आहे. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

close