दलित महिलेची धिंड काढणार्‍या आरोपींची सुटका

July 26, 2010 12:32 PM0 commentsViews: 4

26 जुलै

मुंबईतील रे रोड इथे एका 22 वर्षीय दलित तरुणीची 17 जूनला नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत 12 जणांना अटक झाली होती. यातील 11 आरोपींची आज जामिनावर सुटका करण्यात आली.

12 जणांवर याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीची आधीच जामिनावर सुटका करण्यात आली होती. तर 11 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या 11 जणांना आज सेशन कोर्टात जामीन मंजूर करण्यात आला.

या भागातील शिवसेनेची गटप्रमुख शारदा यादव हिने काही जणांसोबत या मुलीच्या आईला आणि या मुलीला मारहाण केली. तसेच तिची नग्न धिंड काढली होती, असा आरोप करण्यात आला.

शारदा यादव आणि पीडित मुलीच्या घरच्यांमध्ये पाण्यावरुन वाद होत असत. त्याचाच राग मनात धरुन भावाच्या अटकेचे निमित्त करत शारदा यादवने हा प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे.

close