नाशकात गोदावरीचे प्रदूषण

July 26, 2010 12:39 PM0 commentsViews: 167

26 जुलै

नाशिकमध्ये गोदावरीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे.

गोदावरीच्या रामकुंडापासून नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात फेसाळलेलं पाणी वाहत आहे. तसेच या पाण्याला बरीच दुर्गंधीही येत आहे. नागरिकांनी याबद्दल तक्रारी केल्यावर महापालिका आयुक्तांनी नदी पात्राची पाहणी केली.

प्रदूषण कशामुळे झाले असावे याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून मागवला असल्याचे छापील उत्तर त्यांनी दिले आहे. गोदावरीतील प्रदूषणाबद्दल महापालिका प्रशासन आणि प्रदूषण महामंडळ कायमच उथळ भूमिका घेत आले आहे.

दरम्यान, गोदावरी पात्रात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

close