‘शाह यांची चौकशी कोर्टाच्या आदेशानुसारच’

July 26, 2010 1:00 PM0 commentsViews: 2

26 जुलै

सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर प्रकरणी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांच्या चौकशीमागे केंद्र सरकारचा काहीही हात नसल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे निवदन केले.या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येणार असून, यासाठी कामकाज योग्य रितीने होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

'हा सीबीआयचा गैरवापर'

सोहराबुद्दीन एन्काऊंटरप्रकरणी यूपीए सरकार सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा थेट आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरीयांनी केला आहे.

सोहराबुद्दीन हा दाऊद इब्राहिमसाठी काम करत होता, त्याच्यावर 71 गुन्हे दाखल होते, असाही दावागडकरी यांनी केला आहे.

पण दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठीच सरकारने डाव रचल्याचा आरोप गडकरींनी आज मुंबई घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

close