वर्ध्यातील मुले शिकतायत अकोल्याचा भूगोल

July 26, 2010 1:20 PM0 commentsViews: 4

26 जुलै

वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीला 12 वर्षे पूर्ण झाली. पण आजही येथील विनाअनुदानित इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अकोला जिल्ह्याचा भूगोल शिकावा लागत आहे.

12 वर्षांनंतरही पाठ्यपुस्तक महामंडळ या विद्यार्थ्यांना वाशिम जिल्ह्याची माहिती पुस्तकातून उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. पण यामुळे जिल्ह्याची तोंडओळखच विद्यार्थ्यांना होत नाही.

याबाबत शिक्षक आणि पालकांनी अनेकदा तक्रार करुनही पुस्तके उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन कारवाई करत नाही. विना अनुदानित शाळांमध्ये शिकणार्‍या इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या मुलांची संख्या कमी आहे.

त्यामुळे इतकी कमी पुस्तके छापणे शक्य नसल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे म्हणणे आहे.

close