पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

July 26, 2010 1:53 PM0 commentsViews: 6

26 जुलै

ओव्हरहेड वायर आणि रेल्वे ट्रॅकवर फुटब्रिजचा पत्रा आणि बेकायदेशीर दुकानांचा काही भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक आज विस्कळीत झाली.

सांताक्रूझ स्टेशनच्या जवळ ही घटना घडली. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरची वांद्रे ते अंधेरीदरम्यान स्लो ट्रॅकवरची तर सीएसटी ते अंधेरी अशी हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. तर, फास्ट ट्रॅकवरची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

दुपारी सव्वाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जोरदार वारा आणि पाऊस होता. त्यामुळे हे पत्रे उडून ओव्हरहेड वायरवर आले. याचवेळी सांताक्रूझ प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गाडी येत होती. मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.

कटर्सच्या माध्यमातून पत्रा कापण्याचे आणि ट्रॅकवरील ढिगारा उचलण्याचे काम सुरू आहे. फायर ब्रिगेडचे जवान, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. साधारणत: सात वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकेल.

close