एसआरएमध्ये भ्रष्टाचाराचा खडसेंचा आरोप

July 26, 2010 2:07 PM0 commentsViews: 1

26 जुलै

राज्यातील एसआरए प्रकल्पांमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केला.

सायनला आकृती बिल्डरला दिलेला एसआरए प्रकल्प बेकायदा असून त्याला आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नाही. तिथे 100 एकर जमिनीवर होणार्‍या प्रकल्पामध्ये 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला.

तर अंधेरीतील मरोळमध्येही एमआयडीसी प्रकल्पामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. ताडदेवमध्ये 5 हजार कोटींची जमीन सुरूची बिल्डरला कवडीमोल भावाने देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे.

रॉयल पाम बिल्डरला 250 एकर जमीन कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वक्फ बोर्ड घोटाळा चौकशीची मागणी

राज्यात वक्फ बोर्डाने केलेल्या घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणीही खडसे यांनी विधानसभेत केली. मुलुंड येथील एका दर्ग्यात फरार असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाची नेमणूक केल्याचा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला.

दादर येथील पार्किंग स्लॉटची जमीन एका बिल्डरला दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या आरोपांच्या चौकशीसाठी विधिमंडळाची चौकशी समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

close