सागरी प्रवासी वाहतुकीत भ्रष्टाचाराचा आरोप

July 26, 2010 2:56 PM0 commentsViews: 2

26 जुलै

मुंबईतील सागरी प्रवासी वाहतुकीच्या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.44 एकर जमीन फुकटात देण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

नरीमन पॉईंट ते बोरिवली हा सागरी प्रवासाच्या वाहतुकीचा मार्गाचे कंत्राट एका अनुभव नसलेल्या कंपनीला दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या कंपनीचे नाव आहे प्रतिभा इंडस्ट्रीज असे आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे हे कंत्राट संबंधित कंपनीला देण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केला.

सागरी प्रवासी वाहतुकीच्या टर्मिनस उभारणीसाठी जवळपास 45 एकर जागा विकासकाला दिली जाणार आहे.

कोणती जागा या कामासाठी दिली जाणार आहे, त्यावर एक नजर टाकूया…

नरीमन पॉईंट इथे 40,000 चौरस मीटर

बांद्रा इथे 30,000 चौरस मीटर

वर्सोवा इथे 30, 000 चौरस मीटर

मार्वे इथे 10,000 चौरस मीटर

बोरिवली इथे 1,00,000 चौरस मीटर

close