आरबीआयने रेपो रेट वाढवला

July 27, 2010 8:07 AM0 commentsViews: 3

27 जुलै

रिझर्व्ह बँकेनं महागाईच्या विरोधात पावले उचलली आहेत.

बँकांसाठीचा व्याजदर आरबीआयने आज वाढवला. आरबीआयने हा व्याजदर म्हणजेच रेपो रेट पाव टक्क्याने वाढवला आहे. म्हणजे आता रेपो रेट पावणे सहा टक्के असेल.

तर ज्या दराने आरबीआय बँकांकडून पैसा घेते, तो दर अर्धा टक्क्याने वाढवण्यात आला आहे. सीआरआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

याचा थेट परिणाम आपल्याला गृहकर्जांसाठीच्या व्याजदरांवर पहायला मिळू शकतो. यानंतर आता रिझर्व्ह बँक वर्षभरात आठ वेळा क्रेडिट पॉलिसीची समीक्षा करणार आहे. याआधी ही समीक्षा चार वेळा करण्यात येत होती.

close