संसदेत महागाईवरून गोंधळ

July 27, 2010 8:18 AM0 commentsViews: 2

27 जुलै

संसदेच्या अधिवेशानाला आज गोंधळानेच सुरुवात झाली.

महागाईच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणण्याची विरोधकांची मागणी होती. पण ती मान्य न झाल्याने प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी गदारोळ घातला.

त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ शकले नाही.

अखेर राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित तर लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

close