हिंदकेसरी मारूती माने यांचे निधन

July 27, 2010 8:43 AM0 commentsViews: 69

27 जुलै

हिंदकेसरी मारूती माने यांचे आज सकाळी सांगलीत निधन झाले. ते गेल्या महिनाभरापासून आजारी होते. त्यांच्यावर मीरजेतील सिद्धीविनायक हॉस्पीटलमध्ये काही दिवसांपासून उपचार सुरू होते.

जागतिक किर्ती मिळवलेल्या या मल्लाच्या उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलावा, अशी मागणी करण्यात आली होती. ती मान्यही करण्यात आली होती. पण सकाळी हा हिंदकेसरी काळाच्या पडद्याआड गेला.

लाल मातीतील पैलवान हरपल्याची प्रतिक्रिया सगळीकडून व्यक्त होत आहे. मारुती माने यांनी 1962मध्ये जकार्ता इथे झालेल्या आशियाई स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारात गोल्ड मेडल पटकावले होते.

त्यानंतर 1964मध्ये पंजाबच्या कर्नाल येथे झालेल्या अखिल भारतीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत हिंद केसरीचाही बहुमान त्यांनी पटकावला होता.

त्यांची कामगिरी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना 1981मध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले होते.

close