दुसर्‍या दिवशीही श्रीलंकेचे वर्चस्व

July 27, 2010 8:56 AM0 commentsViews:

27 जुलै

कोलंबो टेस्टच्या दुसर्‍या दिवशीही श्रीलंकन बॅट्समननी आपले वर्चस्व गाजवले. कॅप्टन कुमार संगकाराने 219ची दमदार खेळी केली. शेवटी वीरेंद्र सेहवागला दिवसातील पहिली विकेट मिळाली. त्याने संगकाराला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

कालच्या 2 आऊट 312 रन्सवरून श्रीलंकेने आपला खेळ सुरू केला. कॅप्टन कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेने भारतीय बॉलर्सना संधी न देता खेळ केला. दोघांनी मिळून तिसर्‍या विकेटसाठी 193 रन्सची पार्टनरशीप तर केलीच, पण त्याचबराबेर टीमचा स्कोअर साडेचारशेच्या पुढे नेऊन ठेवला.

मॅचच्या दुसर्‍या दिवशीही भारतीय बॉलर्सची फ्लॉप कामगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. आणि श्रीलंकन टीम मॅचमध्ये अशीच खेळत राहीली तर भारताचे टेस्ट क्रिकेटमधील नंबर वन पद धोक्यात येणार आहे.

close