गिरणी कामगारांना मिळणार दिवाळीपूर्वी घरे

July 27, 2010 9:04 AM0 commentsViews: 3

27 जुलै

राज्य सरकारने आधीच जाहीर केल्याप्रमाणे गिरणी कामगारांना त्यांच्या गिरण्यांच्या एक तृतीयांश जागेवर मोफत घरे देण्यात येणार आहेत. आणि ही घरे आता दिवाळीपूर्वीच दिली जाणार आहेत.

विधानसभेत राज्य सरकारने ही घोषणा केली आहे.

यात एकूण 10 हजार 156 घरांचे वितरण करण्यात येणार आहे.

15 ऑगस्ट पासून त्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मूळ संपकरी गिरणी कामगारांमध्ये प्राधान्यक्रमाने या घरांचे वाटप होणार आहे.

गिरणी कामगार संघर्ष समिती कामगारांच्या त्यावेळच्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवणार आहे.

close