काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

July 27, 2010 10:19 AM0 commentsViews: 4

27 जुलै

पुण्यात काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली.

पुण्यात काँग्रेसभवन येथे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक होती. या दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ही तुफान हाणामारी झाली.

यावेळी संजय जगताप यांनी संभाजी कुंजीर यांना मारहाण केली. तसेच संभाजी कुंजीर यांच्यावर खुर्च्याही फेकण्यात आल्या.

close