नो डेव्हलपमेंट झोनमध्ये कॅसिनो, पबसाठी प्रस्ताव

July 27, 2010 10:26 AM0 commentsViews: 6

आशिष जाधव, मुंबई

27 जुलै

नो डेव्हलपमेंट झोनमध्ये जादा एफएसआय वापरून बांधकामास राज्य सरकारने परवानगी दिली. तसे नोटीफिकेशन नगरविकास खात्याने अलीकडेच जारी केले.

त्यामुळे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये कॅसिनो आणि पब रिसॉर्टच्या बांधकामाचे 100हून अधिक प्रस्ताव सरकार दरबारी जमा झाल्याची माहिती उघड झाली आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगराच्या आजूबाजूच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी नो डेव्हलपमेंट झोन तयार करण्यात आले. पण आधी 0.2 इतका एफएसआय देऊन रिसॉर्ट बांधण्याला परवानगी देण्यात आली. तर गेल्या एप्रिल महिन्यात नगरविकास खात्याने नवे नोटीफिकेशन काढून नो डेव्हलपमेंट झोनचा एफएसआय 100 पटीने वाढवला. म्हणजेच आता या परिसरात 0.4 एफएसआयचे बांधकाम करता येणार आहे.

या नोटिफिकेशमुळे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये रिसॉर्ट, कॅसिनोज, हॉटेल्स बांधायला परवानगी मिळाली आहे. त्यासाठी शहरात हॉटेल बांधल्यानंतर जो जादा एफएसआय मिळेल, तो टीडीआर म्हणून या ठिकाणी वापरता येणार आहे.

नोटीफिकेशन निघाल्या निघाल्या कॅसिनोज, पब, रिसॉर्ट, हॉटेल्सचे प्रस्ताव सरकार दरबारी जमा झालेत. पण मुख्यमंत्री मात्र यावर काहीच बोलत नाहीत.

नो डेव्हलपमेंट झोनमध्ये अय्याशी पर्यटनाला चालना देऊन सरकारने एक प्रकारे पर्यावरणाच्या हानीत भरच घातली आहे, असेच म्हणावे लागेल.

close