‘हेमंत करकरेंचा मृत्यू खांद्याला गोळ्या लागल्याने’

July 27, 2010 11:46 AM0 commentsViews: 5

27 जुलै

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आज सभागृहात ठेवण्यात आला.

भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा रिपोर्ट सभागृहात ठेवला. करकरेंचा मृत्यू मानेला नव्हे, तर खांद्याला गोळ्या लागल्याने झाल्याचे त्यांनी यातून स्पष्ट केले.

तसेच करकरेंचा मृत्यू मानेला लागलेल्या गोळ्यांमुळे झाल्याचा सरकारचा दावा खोटा असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

करकरेंना खांद्याला पाच गोळ्या लागल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी केलेला दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला.

close