बिहारमध्ये मुलाला अमानुष मारहाण

July 27, 2010 12:07 PM0 commentsViews: 6

27 जुलै

बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका मुलाला अमानुष मारहाण झाल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे.

बिहारमधील हाजीपूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाच्या पतीने ही मारहाण केली आहे. राजेश महातो असे त्या मुलाचे नाव आहे. पण बलात्काराचा आरोप खोटा आहे, महिला सरपंचाविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केल्याने ही मारहाण झाल्याचा राजेशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर मिळण्यासाठी राजेशच्या कुटुंबाने सरपंच संगीता देवीला 10 हजार रुपये दिले होते. ते परत करावेत, अशी राजेशच्या कुटुंबीयांची मागणी आहे. त्यावरूनच ही मारहाण करण्यात आली आहे.

राजेश महातोला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महिला सरपंचाचे पती शंभू शरण रॉय याच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

close