मुंबईची पाणी टंचाई मिटणार

July 27, 2010 2:48 PM0 commentsViews: 20

27 जुलै

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर, तुळशी आणि विहार हे तीन तलाव भरुन वाहू लागले आहेत.

आता तानसा आणि भातसा ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली की, मुंबईत लागू असलेली 15 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आज दिली.

शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन धरणांच्या साठ्यात चांगली वाढ झाली तर 15 ऑगस्टच्या आधी पाणीकपात रद्द केली जाईल. मान्सूनच्या आगमनापासून गेला दीड महिना तलाव परिसरात चांगला पाऊस झाला आहे.

तुळशी तलाव आज सकाळी सहा वाजता भरुन वाहू लागला. तर मोडक सागर सकाळी आठ वाजता भरून वाहू लागला.

close